चाळीसगाव, प्रतिनिधी । जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आज , शुक्रवार दि. ५ रोजी रोटरी क्लब ऑफ चाळीसगावच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ चाळीसगातर्फे जवळ जवळ ५० भारतीय मुळ प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी रोटरी सदस्य रोटे बाळासाहेब सोनवणे, संमकीत छाजेड, राजेंद्र कटारिया, भास्कर पाटील, रोशन ताथेड, संग्रामसिंग शिंदे, डॉ. संदीप देशमुख तसेच वनविभागाचे प्रकाश देवरे, जाट सर आदी उपस्थित होते. कोरोना सारख्या संकटकाळी, लॉकडाउन असताना निसर्ग देखील आपली कात टाकत आहे. निसर्गाचे फुफ्फुसे असलेल्या झाडांचे संवर्धन ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख यांनी आपल्या यांनी व्यक्त केले.