Home Cities एरंडोल पोलीस भरती प्रतिक्षा यादीची निवड प्रक्रिया पुर्ण करण्याची आ. चिमणराव पाटील यांची...

पोलीस भरती प्रतिक्षा यादीची निवड प्रक्रिया पुर्ण करण्याची आ. चिमणराव पाटील यांची मागणी


पारोळा प्रतिनिधी । राज्यातील दोन वर्षांपासून पोलीस भरती झालेली नसल्याने २०१८ मधील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड प्रक्रिया पुर्ण करण्याची मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रात मागील दोन वर्षापासून पोलीस भरती झालेली नाही. तसेच महाराष्ट्र पोलीस भरती-२०१८ मधील प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची निवड यादी देखिल अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाही. जगभराप्रमाणेच महाराष्ट्रात देखिल करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन चांगल्या प्रकारची कामगिरी करत असून २०१८ मधील पोलीस भरती प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना कामावर रुजू करून घ्यावे. अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी केली आहे.


Protected Content

Play sound