Home Cities जळगाव ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’चे वसीम खान यांचा ‘कोरोना योध्दा’ने सत्कार

‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’चे वसीम खान यांचा ‘कोरोना योध्दा’ने सत्कार

0
45


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकड्यांचा आलेखही वाढत आहे. अशी परिस्थिती असतांना लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजचे प्रतिनिधी वसीम खान यांनी आपल्या स्व:खर्चाने शनिपेठ परिसरात सॅनिटायझरची फवारणी करून परिसर निर्जंतूकीकरण केले. दरम्यान कोविड योध्दा म्हणून ना. गुलाबराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

वासीम खान हे शनीपेठ भागातील रहिवासी आहे. माणूसकीच्या नात्याने आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा उदात्त हेतू लक्षात घेवून स्व:खर्चाने फवारणीचे औषध विकत घेवून स्वत: मैदानात उतरून फवारणी केली आहे. शनीपेठ परिसरात मोठ्याप्रमाणावर वस्ती आहे. रस्त्यावर सॅनिटायझरची फवारणी करून कोवीड-१९ विषाणूची जनजागृती केली जात आहे. दरम्यान कोवीड आजाराचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वांनी मिळून युध्द लढवू, तसेच नागरीक, महिला, ज्येष्ठ नागरिक यांनी घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.


Protected Content

Play sound