Home आरोग्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयाची धुरा जि.प. सीईओंकडे !

वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयाची धुरा जि.प. सीईओंकडे !

0
33


जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात पसरत असतांना आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासक म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर जिल्हा परिषदेचे सीईओ बी. एन. पाटील यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली असून वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील सुविधा प्रभावीपणे वापरणे, प्रशासकीय नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे सीईओ यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रशासक म्हणून नियुक्त करुन त्यांना प्रशासकीय अधिकार देण्यात आले आहेत. तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना त्यांचे नियमित असलेले रुग्णसेवेचे व उपचाराचे कार्य उपलब्ध यंत्रणेमार्फत सुरु ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत.


Protected Content

Play sound