भुसावळ शहरातील बँकेत खातेदारांची गर्दी ; सोशल डिस्टन्सिंगचा उडाला फज्जा (व्हिडिओ)

 

भुसावळ, प्रतिनिधी | कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे असे विविध उपाय सुचविण्यात आले आहेत. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात असलेल्या एका बँकेत नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग न पाळता गर्दी केली असल्याचा धक्कादायक प्रक्रारसमोर आला आहे.

शहरातील ज्या भागात कोरोना बाधितरूग्ण आढळून आले आहे तो भाग प्रशासनाने सिल केला आहे. शहरातील शनी मंदिर वार्डामध्ये देखील काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने हा भाग सिल करण्यात आला होता. या भागात सिंडिकेट बँक असल्याने बँक सुध्दा गेल्या पंधरा दिवसांपासून बंदच होती. आज बँक सुरू झाल्याने बँकेच्या खातेदारांनी बँकेसमोर लांबलचक रांग लावली असल्याचे दिसुन आले आहे. सोशल डिस्टनन्सिंगचे कोणत्याही प्रकारचे पालन या ठिकाणी होत नसल्याचे चित्र येथे पहावयास मिळाले. याला जबाबदार कोण? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहे. तरी देखील शहरात दररोज नव्या कोरोना बांधित रूग्णाची संख्या वाढत आहे. सिंडिकेट बँकेच्या खातेदारांची बँक समोर उन्हात लांबलचक रांग लागली तरी देखील बँकेच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची उपाययोजना केली नसल्याने सोशल डिस्टनन्सिंगचा फज्जा उडाला असल्याचे या ठिकाणी दिसुन येत आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/692137901585267/

 

Protected Content