लोणवाडी येथे पोलिसाचा तरूणीवर अत्याचार; एमआयडीसी पोलिसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । संधीचा वेळोवेळी फायदा घेत पोलिस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गावातील १९ वर्षीय तरूणीवर अत्याचार करत आपली वासना भागवली. त्यातच त्या अत्याचार पिडीत तरूणीला तीन महिन्याची गर्भ राहिल्याने तिने एमआयडीसी पोलीसात फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील लोणवाडी येथील १९ वर्षीय तरूणीवर पोलीस खात्यात काम करणारा कर्मचारी संशयित आरोपी कैलास तुकाराम धाडी रा. लोणवाडी ता.जि.जळगाव याने आपल्या शेतात ऑक्टोबर २०१९ ते आजपावेतो वेळोवेळी संधीचा व असहाय्यतेचा फायदा घेत तिच्या गावाला जावून आपली वासना भागविली. त्यात तिला तीन महिन्याचा गर्भ राहिला. जबरदस्ती करत तिच्या अनेकवेळा अत्याचार केला. गेल्या आठदिवसापुर्वी ती विवाहबध्द झाली आहे. सासरकडची मंडळी ही चांगल्या स्वाभावाचे असल्याने तीने ही बाब पती व सासु सासऱ्यांच्या कानावर आपबिती सांगितली. नंतर त्या नवविवाहितेची पती व सासुने चाळीसगाव येथील खासगी रूग्णालयात तपासणी केल्यानंतर तीन महिन्याचा गर्भ आढळून आला. गर्भ असल्याचे कळताच विवाहिता ढसाढसा रडू लागली मात्र सासरकडच्या मंडळींनी तिला धिर दिल्याने थेट पोलीसात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार जळगाव एमआयडीसी पोलीसात या पीडित नवविवाहितेच्या फिर्यादीवरून शेतमालक असलेल्या संशयित आरोपी कैलास धाडे याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी कैलास धाडे हा गेल्या दोन वर्षापुर्वी जळगावातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत होता. त्यानंतर त्याची पहुर पोलिस ठाण्यात बदली झाली. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी पीडितेची प्रत्यक्ष भेट घेतली व माहिती जाणून घेतली. त्या आरोपीच्या शोधासाठी स्वतंत्र पथक रवाना झाले आहे. पुढील तपास पो.नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल मोरे करीत आहे.

Protected Content