…हे तर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयास बदनाम करण्याचे षडयंत्र- देवेंद्र मराठे

जळगाव प्रतिनिधी । आज डिजीटल मीडियात प्रसिध्द करण्यात आलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची बदनामी करण्याचा कट असल्याचा दावा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी केला आहे. आज लाईव्ह ट्रेंडस न्यूजवर प्रकाशित झालेल्या वृत्ताबाबत मराठे यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.

आज दुपारी प्रकाशित झालेल्या वृत्ताबाबत देवेंद्र मराठे यांनी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची बाजू मांडली आहे. यात नमूद केले आहे की,

आज सोशल मीडिया वरती डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच कोरोणाच्या पार्श्वभूमीवरती शासनाने जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणून अधिग्रहीत केलेल्या रुग्णालयातील एक व्हिडिओ बघितला. परंतु व्हिडिओ मधून कुठल्याही प्रकारची सत्यता निष्पन्न होत नाही आहे.
उलट हा व्हिडीओ कुठल्यातरी षडयंत्राचा भाग आहे असे दिसून येत आहे. गोदावरी हॉस्पिटल नेहमीच सेवाभावी व अपघाती महामार्गावरील अपघात ग्रस्त रुग्णाला नवीन जीवन प्राप्त करून देणारे जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय ठरले आहे. रुग्णालयाच्या सेवाभावी अध्यक्षांविषयि बोलण्याचे ठरवले तर काँग्रेस पक्षातील निष्ठावंत ज्येष्ठ नेते ते माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या विषयी संपूर्ण जिल्ह्याला चांगल्या प्रकारे ओळख आहे.

ज्याप्रमाणे डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत.त्याच पद्धतीने आपल्या व्यवसायाची सुद्धा एकनिष्ठ राहून जिल्ह्यातील इतर राजकारणी प्रमाणे केवळ राजकारण न करता आरोग्य सेवेचे व्रत हाती घेऊन गोदावरी हॉस्पिटल च्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना आतापर्यंत फक्त मुंबई, पुणे येथे उपलब्ध असलेल्या कॅन्सर, हृदयविकार यासारख्या मोठ-मोठ्या आजारांवरील मोफत ट्रीटमेंट त्यांनी जळगाव येथे मोफत उपलब्ध करून दिली.

आतासुद्धा ज्यावेळेस संपूर्ण राज्यावर व आपला जळगाव जिल्हा वरती सुद्धा कोरोना या आजाराचं संकट आलं. त्यावेळेस इतर पक्षातील राजकारणी आपली जबाबदारी झटकून घरांमध्ये लपून बसले असताना अवघे तेरा महिने खासदारकीचे मिळाल्यानंतर सुद्धा व मोठमोठे जिल्ह्यातील डॉक्टर्स त्यांचे स्वतःचे हॉस्पिटल कोरोणाच्या भीतीपोटी बंद करून बसले असताना गोदावरी हॉस्पिटल व डॉ. उल्हास पाटील यांनी आपले स्वतःचे खाजगी रुग्णालय कोरोणासाठी शासनाला जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणजेच सिविल हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यासाठी सुपूर्त केले.

मग प्रश्न पडतो इतके सेवाभावी रूग्णालय असल्यावरही ही नेमकी रुग्णालयाची बदनामी कोण करत आहे ?यामागील कोणतं षड्यंत्र आहे ?

डॉ.उल्हास पाटील हे नेहमीच काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहत जिल्ह्यातील भाजप पक्षाशी लढा देत आलेले आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाच्या 2019 च्या निवडणुकीत सुद्धा डॉ. उल्हास पाटील यांनी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती.

निवडणूक म्हटली म्हणजे विविध सामाजिक संघटनांची निवडणुकीतील उमेदवारांकडून वेगवेगळ्या अपेक्षांची मागणी मोठ्या प्रमाणात सुरु होते .
आजच्या गोदावरी हॉस्पिटल च्या व्हिडिओ मागील षड्यंत्र व सत्यता सुद्धा याच रावेर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एका सामाजिक संघटनेसोबत डॉ.उल्हास पाटील यांची अपयशी झालेली डील. त्या विशिष्ट संघटनेची अपेक्षा डॉ.उल्हास पाटील यांच्याकडून पूर्ण न झाल्यामुळे रुग्णालयाच्या माध्यमातून आपली मागणी पूर्ण न केल्यामुळे त्याच्या रागातून व्हिडिओ क्लिप च्या माध्यमातून डॉ. उल्हास पाटील व रुग्णालयाला अडचणीत आणण्याचं काम तर सुरू केले आहे.

त्यामुळे रावेर लोकसभा निवडणुकीच्या वेळेस न फिरवलेली भाकरी आता फिरवण्याची मागणी जणु काही होत असल्याचं या व्हिडिओच्या मागून निष्पन्न होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्याप्रकारे माहिती आहे. खासगी रुग्णालयांमध्ये या हृदयविकाराच्या ऑपरेशन साठी लाखो रुपयांचा खर्च येतो. ते ऑपरेशन गोदावरी रुग्णालयात मात्र मोफत करण्यात येतं

त्यामुळे अशा प्रकारचे कितीही व्हिडिओ बनवून रुग्णालयाची व डॉक्टर उल्हास पाटील यांची बदनामी करण्याचे काम जे कोणी करत असतील. त्यांनी हे तात्काळ थांबवावे कारण याचा काहीएक उपयोग होणार नाही. लोकांना दूध का दूध आणि पाणी का पाणी म्हणजेच सत्यता सर्व चांगल्याप्रकारे माहिती आहे.
(लाईव्ह ट्रेंडस न्यूजने याबाबत डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची बाजू मांडली आहे.)

Protected Content