धक्कादायक : अंत्यविधीला हजेरी लावणाऱ्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग

उल्हासनगर (वृत्तसंस्था) कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्यविधीला हजेरी लावणाऱ्या १९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरात घडली आहे. धक्कादायक म्हणजे अजूनही अनेकांचे स्वॉब अहवाल येण्याचे बाकी असल्यामुळे यंत्रणेचे धाबे दणाणले आहे.

 

उल्हासनगर कॅम्प नं-३ हिराघाट परिसरात राहणारा ४५ वर्षाचा इसम एका खासगी वाहनावर चालक असल्याने त्याचे मुंबईला येणे जाणे होते. गेल्या आठवड्यात त्याला चक्कर येऊन रस्त्यावर पडल्याने एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, त्यानंतर मध्यवर्ती रुग्णालयात नेऊन मृत्यू पश्चात रुग्णालयाने त्याचा स्वाब घेतला. नातेवाईकांकडून अंत्यविधीचे सर्व नियम लिहून घेण्यात आले. परंतू तरी देखील अंत्ययात्रेत अनेक जण सहभागी झाले. एवढेच नव्हे तर स्मशाभूमीत पाणी पाजण्यासाठी मृतदेह उघडण्यात आला. मात्र दुसऱ्या दिवशी मृत व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने हिराघाट परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Protected Content