देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1 लाख 73 हजार 453 वर पोहचला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा आता 1 लाख 73 हजार 453 वर पोहचला आहे. चिंताजनक म्हणजे मागील 24 तासात आतापर्यंत सर्वाधिक 265 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

 

देशात एका दिवसात 11 हजार 264 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामधील सर्वाधिक महाराष्ट्रातील आहेत. याशिवाय काल 7 हजार 964 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत कोरोनाचे एक लाख 73 हजार 763 रुग्ण आहेत. त्यापैकी 4971 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 82 हजार 370 जण बरे झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात 2682, दिल्लीत 1105, तमिळनाडुत 874, गुजरातमध्ये 372, राजस्थान 298, प. बंगाल 277, उत्तरप्रदेश 275, कर्नाटक 248, हरियाणा 217, उत्तराखंड 216, बिहार 174, जम्मू-काश्मीर 128 आणि असाममध्ये 144 सह इतर ठिकाणी 341 रुग्ण सापडले होते.

Protected Content