मुक्ताईनगरजवळ कांद्याने भरलेला ट्रक कलंडला; चालकासह क्लिनर जखमी (व्हिडीओ)

मुक्ताईनगर प्रतिनिधी । मलकापूरहून येणाऱ्या बसने कट मारल्याने चालकाचा ताबा सुटून कांद्याने भरलेला ट्रक कलंडल्याची घटना आज दुपारी मुक्ताईनगरजवळ घडली. यात ट्रकचालकासह क्लिनर जखमी झालाय.

सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर शहराच्या पुढे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या फार्म हाऊसजवळ मलकापूरहून धुळ्याला जाणाऱ्या खासगी बसने ओव्हरटेक केल्याने ट्रक (सीजी ०४- एमएच ७५६८) वरील ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक कलंडली. ट्रकमध्ये नाशिक जिल्ह्यातील सायखेडा येथून कांद्याच्या गोण्या भरलेल्या होत्या. सदर ट्रक हा पश्चिम बंगालमधील खडकपूर येथे जात होता. क्लिनर नंदकुमार साहू याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. तर चालक विक्की भाई याच्या पाठीला जबर मार बसला असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद झालेली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/273435767113377/

Protected Content