crime bedya
क्राईम, जळगाव

जळगावात आठ किलो गांजा जप्त; तिघांवर गुन्हा

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन यांनी काही दिवसांपासून कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पिंप्राळ्यातील तलाठी कार्यालयाजवळ आज सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास तिघांचा पाठलाग करून ९६ हजार रूपये किंमतीचा सात ते आठ किलो गांजा जप्त करीत त्यांनी कारवाई केली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

kirana

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, सहायक पोलीस अधीक्षक डॉ़ निलाभ रोहन यांना पिंप्राळ्यात तीन जण व्यक्ती गांजा घेवून येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार डॉ.रोहन यांच्या पथकासह रामानंदनगर पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास पिंप्राळा गाठले़ त्यानंतर तलाठी कार्यालयाजवळ सापळा रचल्यानंतर काही वेळानंतर संशयित आरोपी शाहरूख सलीम खाटीक (वय-२६), करण प्रकाश पवार (वय-२१) आणि वाल्मिक तानाजी सुर्वे (वय-२५) तिघे रा. गेंदालाल मील जळगाव यांचा पाठलाग करून पकडून झडती घेतली असता त्यांच्याजवळ ९६ हजार रूपये किंमतीचा सात ते आठ किलो गांजा पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएच ८८९४) असा एकुण १ लाख ६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्त केला आहे. तिघांना अटक केली आहे. तिघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
सहायक पोलीस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन, पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि श्री राठोडे, पो.ना. विजय खैरे, पो.कॉ.उमेश पवार, विश्वनाथ गायकवाड, रविंद्र पाटील, अतुल पवार, संतोष गिते, रमेश अहिरे, रविंद्र चौधरी यांनी कारवाई केली.