world coronaviru
आरोग्य, जळगाव

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४२८ वर !

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात अजून १४ पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या ४२८ इतकी झाल्याची माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे.

kirana

आज रात्री उशीरा जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोनाबाबतचे स्टेटस एका प्रेस नोटच्या माध्यमातून अपडेट केले आहे. यानुसार-जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त. पैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पाॅझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रूग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

काल पर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधीतांचा आकडा हा ३८२ इतका होता. यानंतर आज तब्बल ४६ नवीन रूग्णांची संख्या वाढली आहे. यातील सर्वाधीक रूग्ण हे भुसावळचे असल्याचे दिसून आले आहे.