ACB 1
क्राईम, चाळीसगाव, जळगाव

लाचखोर सहाय्यक फौजदारासह पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

शेअर करा !

जळगाव प्रतिनिधी । तक्रारदार यांची गांज्याची केस दाखल करून नये यासाठी ८ हजार रूपयांची लाच मागणाऱ्या चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदारासह पोलीस कॉन्स्टेबल या दोघांवर चाळीसगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

kirana

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांच्याकडे कामावर असलेल्या इसमावरती गांज्याची केस दाखल न करण्यासाठी संशयित आरोपी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बापुराव फकीरा भोसले, (वय-५२) रा. आमडदे, ता.भडगाव. ह.मु. भडगाव रोड,चाळीसगाव आणि पो.कॉ गोपाल गोरख बेलदार,(वय-३१) रा. शेंदुर्णी,ता.जामनेर. ह.मु.शाहु नगर,भडगाव रोड,चाळीसगाव यांनी १० हजाराची मागणी केली. ४ मे व ५ मे २०२० रोजी तडजोडी अंती ८ हजार रूपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने ॲन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई
पोलीस अधिक्षक गोपाल ठाकुर, पोलीस निरीक्षक निलेश लोधी, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, सफौ रविंद्र माळी,पोहेकॉ सुनिल पाटील, पोहेकॉ.सुरेश पाटील, पोना.मनोज जोशी, पोकॉ.प्रविण पाटील,पोकॉ.नासिर देशमुख,पोकॉ.ईश्वर धनगर यांनी कारवाई केली. पुढील तपास संजोग बच्छाव करीत आहे.