Home आरोग्य भुसावळात कोरोनाची व्याप्ती वाढली; तीन नवीन बाधीत

भुसावळात कोरोनाची व्याप्ती वाढली; तीन नवीन बाधीत

0
41


भुसावळ प्रतिनिधी । शहरात कोरोना बाधीतांची व्याप्ती वाढली असून अजून तीन नवीन रूग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तर प्रशासनाने तातडीने संबंधीतांच्या संपर्कात असलेल्यांना क्वॉरंटाईन केले आहे.

भुसावळ शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येत आहे. यातच रात्री उशीरा तीन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या बाधितांमध्ये दोन डॉक्टरांसह एका तरूणाचा समावेश आहे. यातील दोन बाधीत हे डॉक्टर असून तिसरा रूग्ण हा सिंधी कॉलनी भागातील रहिवासी आहे. हे तिन्ही रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह असल्याच्या माहितीला स्थानिक आरोग्य यंत्रणेने दुजोरा दिला असला तरी अद्याप जिल्हा पातळीवरून याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे या तिन्ही रूग्णांच्या संपर्कात असलेल्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून त्यांच्या रहिवासाचा परिसर सील करण्यात येणार आहे. दरम्यान, या तीन नवीन रूग्णांमुळे आता भुसावळातील कोरोना बाधितांचा आकडा ६८ वर पोहचला आहे.


Protected Content

Play sound