world coronaviru
आरोग्य, जामनेर

बाधीत पोलीसाशी संपर्कामुळे पहूर येथील चौघांचे घेतले स्वॅब

शेअर करा !

पहूर, ता . जामनेर प्रतिनिधी । जळगाव येथील कोरोना बाधीत पोलिसाच्या संपर्कात आलेल्या चार जणांचे स्वॅब खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात आल्याची माहिती येथील नोडल अधिकार्‍यांनी दिली आहे.

kirana

याबाबत वृत्त असे की, येथील बाधित पोलीस कर्मचार्‍याच्या संपर्कात आलेल्या पहूर परिसरातील चार जणांचे येथील ग्रामीण रुग्णालयात आज वैद्यकिय अधिक्षक तथा नोडल अधिकारी डॉ . हर्षल चांदा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वॅब घेण्यात आले .
यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ . जितेंद्र वानखेडे, डॉ . संदिप कुमावत , डॉ . सचिन वाघ , डॉ . पुष्कराज नारखेडे यांच्यासह परी चारीका व आरोग्य कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. चारही जणांना खबरदारीचा उपाय म्हणुन पहूर येथील विलगीकरण कक्षात क्वारंटाईन करण्यात आले आहे.