कोरोना बाधीताच्या मृत्यूनंतर एरंडोल येथील कंटेनमेंट झोन सील

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल येथील कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीचा कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याच्या निवासाच्या परिसराला सील करण्यात आले आहे. बाधीताच्या संपर्कातील लोकांचे सँपल घेण्यात आले आहेत.

एरंडोल येथे क्वारंटाईन असलेले ५१ पोलीस कर्मचारी, एक खाजगी डॉक्टर, ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी, व एकोणवीस पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले याप्रमाणे एकूण ७२ लोकांचे शुक्रवारी स्वॅब घेण्यात आले अशी माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे.

एरंडोल येथे कंटेनमेट झोनला सील करण्यात आले आहे त्या भागाचे आरोग्य विभाग न.पा.कर्मचार्‍यांच्या पथकाद्वारे सर्वेक्षण सुरू आहे तसेच कंटेनमेंट झोन मधील नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी नगरपालिकेचे पथक नेमण्यात आले आहे त्यांना स्वयंसेवक सहकार्य करीत आहेत.
शुक्रवारी मृत कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार केलेल्या शहरातील एका खाजगी डॉक्टरांचे क्लिनिक सील करण्यात आले. बाधित रुग्णाने दोन दिवस या क्लिनिकमध्ये उपचार घेतलेला आहे.त्यामुळे ते क्लीनिक सील करण्यात आले असून डॉक्टर सह इतर दोन कर्मचार्‍यांना होम क्वारंनटाइन करण्यात आले.
तसेच माळी वाडा कंटेंटमेंट झोन एरंडोल येथे पूर्ण एरिया सील असून लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्यासाठी व्हाट्सअप ग्रुप केला आहे.

दरम्यान, २८४ घरांचे सर्वेक्षण ४ पथकांनी केले असून १३४४ व्यक्तींना लक्षणे नाहीत असे दिसून आले आहे.वय ६० पेक्षा जास्त,मधुमेह,फुफ्फुस हृदय रोग अशी यादी मोबाईल नंबर सह तयार केली जात असून लवकर येथे होमिओपॅथी औषध मोफत वाटप नियोजन केले आहे.

Protected Content