crime 2
क्राईम, भुसावळ

भुसावळात किराणा दुकानदारावर प्राणघातक हल्ला

शेअर करा !

भुसावळ प्रतिनिधी – शहरातील दिनदयाल नगरात किराणा दुकानदारावर धारदार हत्यारने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज घडली. या घटनेमुळे भुसावळात खळबळ उडाली आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शहरातील दिनदयाल नगराजवळील लेंडी पुरा येथे एका किराणा दुकानदार राजू वाघीया याच्यावर अज्ञातांना धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. हल्ला करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे लेंडीपुरा परीसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली आहे.

kirana