धरणगाव, राजकीय

धरणगाव पालिकेच्या उपनगराध्यक्ष अंजली विसावे यांचा राजीनामा

शेअर करा !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील पालिकेच्या उपनगराध्यक्ष अंजली भानुदास विसावे यांनी आज आपला राजीनामा नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे सोपवला आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे सौ.विसावे यांनी राजीनामा दिल्याचे माहिती समोर आली आहे.

kirana

 

नगरपालिका उपनगराध्यक्षा अंजली विसावे यांनी पक्ष आदेशाने ठरल्यानुसार कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे आपला राजीनामा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख शिवसेना गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्याकडे सादर केला आहे. सौ.विसावे यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. आता पालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आता कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख शिवसेना गुलाबराव वाघ हे निर्णय घेणार आहेत. दरम्यान,निलेश चौधरी यांनी सौ. विसावे यांचा राजीनामा मंजूर केला असून पुढील कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रवाना केला आहे.