Sonia Gandhi
राजकीय, राष्ट्रीय

केंद्र सरकारचे पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा : सोनिया गांधी

शेअर करा !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने देशभरातल्या स्थलांतरित मजुरांच्या १३ कोटी कुटुंबीयांकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. एवढेच नव्हे तर केंद्र सरकारने २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.

kirana

 

पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटींचे जाहीर केलेले पॅकेज हे शेतकरी, स्थलांतरित मजूर, लघु आणि मध्यम उद्योजक आणि गरीबांसाठी असल्याचे म्हटले. मात्र हे सगळं पॅकेज म्हणजे देशाची क्रूर थट्टा आहे अशी टीका आता सोनिया गांधी यांनी केली आहे. अशा प्रकारचे पॅकेज जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सल्लामसलत आपल्या विरोधी पक्षांसोबत केली पाहिजे असे या सरकारला वाटले नाही. यांनी एकतर्फी निर्णय घेऊन टाकला असेही सोनिया गांधींनी म्हटले आहे.