mns
आरोग्य, यावल, राजकीय

कोरोना योद्धयांना सुरक्षा किट द्या ; मनसेची मागणी

शेअर करा !

यावल, प्रतिनिधी। कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे निर्माण झालेल्या वैद्यकीय आणीबाणीच्या काळात आरोग्य विभाग, डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांची सेवा कार्याची भूमिका असुन शासनाच्या वतीने डॉक्टर्स यांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन सॅनिटायझर, मास्क, हॅण्डक्लोज, पीपीइ किट व इत्यादी साहीत्य पुरवण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले.

kirana

राज्यात सध्या कोरोना विषाणुच्या आजारामुळे सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आले आहे. राज्यात आपातकालीन परिस्थिती निर्माण झाली असतांना यावल तालुक्यात देखील मागील सहा दिवसात कोरोनामुळे दोन जणांचा बळी गेला आहे. सात जणांचा अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली असुन भीतीचे वातावरण पसरले आहे . अशा संकटासमयी यावल तालुकातील व यावल ग्रामीण रुग्णालय यंत्रणाही सज्ज आहे. या कोरोना योध्यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर, मास्क, हॅण्डक्लोज, पीपीइ किट व इतर आवश्यक सुविधा देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन तहसीदार जितेन्द्र कुवर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल शहराध्यक्ष चेतन अढळकर, तालुका सचिव संजय नन्नवरे, विरेन्द्रसिंग राजपुत, सचिन बारी, अजय तायडे, श्याम पवार यांनी केली आहे.