wp 15901433851628055364457220573262
धरणगाव, राजकीय

धरणगावात भाजपाच्या ‘माझे आंगण ते माझे रणांगण’ आंदोलनात विविध घोषणाबाजी

शेअर करा !

धरणगाव प्रतिनिधी । कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत आज धरणगाव भाजपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी राज्य सरकारचा निषेध करून ‘ठाकरे सरकारचा धिक्कार असो’ यासह विविध घोषणाबाजी करण्यात आली.

kirana

कोरोनाविषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार अपयशी ठरल्यामुळे राज्य सरकारचा निषेध करून, सरकारला जाब विचारण्यासाठी लॉकडाऊनचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. भाजपा कार्यालयासमोर पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थिती देवून निषेध आंदोलनात सहभाग नोंदविला.

यांची होती उपस्थिती


यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पी.सी. पाटील, जिल्हाकार्यकारणी सदस्य शिरीष बयस, तालुकाध्यक्ष संजय महाजन, प्रकाश सोनवणे, पुनिलाल महाजन, जिजाबराव पाटील, शेखर पाटील, दिलीप महाजन, ललित येवले, सुनील चौधरी, कांतीलाल माळी, कन्हैया रायपुरकर, टोनी महाजन, अनिल महाजन ,इच्छेश काबरा, जितेंद्र महाजन आदी उपस्थित हेते.