ST Bus 1491275713199
यावल, सामाजिक

कोरोनाच्या लॉकडाऊननंतर यावल आगारातील बसेस धावू लागल्या

शेअर करा !

यावल प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे गेल्या दोन महिन्यापासून राज्यात लॉकडाऊनमुळे परिवहन मंडळाच्या बससेवा बंद ठेवण्यात आले होते. दोन महिन्यानंतर आजपासून काही नियम व अटीशर्तीवर यावल आगारातील जिल्हांतर्गत बससेवा सुरू झाली आहे.

kirana

या करीता खबरदारीचा उपाय म्हणुन एसटी बसच्या आसनक्षमतेच्या ५० टक्केच प्रवासी यात प्रवास करू शकता, जेष्ट नागरीक १० वर्षाखालील मुलांना प्रवास नसेल, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळुन, प्रवासांनी व एसटीच्या चालक वाहकांनी व कर्मचाऱ्यांनी आपले हात सेनिटायझर निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहणार, प्रवासांनी व वाहक चालकांनी व कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्क लावणे अनिवार्य आहे. सर्व एसटी बसगाडया सॅनिटायझरद्वारे निर्जंतुकरण करण्यात येणार, यावल आगारातुन नियमानुसार सकाळी ७ ते सांयकाळी ७ वाजेपर्यंत ही बससेवा सुरू राहणार असुन, यावल एसटी आगारातून आज पासून यावल ते रावेर, यावल ते सावदा, यावल ते धानोरा, यावल ते कोळन्हावी पर्यंत बससेवा सुरू करण्यात आल्याची माहिती यावल आगाराचे प्रभारी आगार व्यवस्थापक एस.व्ही.भालेराव, आगार निरिक्षक जी.पी.जंजाळ, वाहतुक नियंत्रक संदीप अडकमोल वाहतुक, नियंत्रक विकास करांडे खतिब तडवी यांनी दिली आहे.