धरणगाव, प्रतिनिधी । येथील तिरुपती मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हात कोरोनाच्या थैमानामुळे रक्त साठाची आवश्यकता व तुटवडा लक्षात घेता धरणगाव येथील रोहन भाटीया व त्यांच्या मित्र परिवारांनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
रक्तदान शिबिरामध्ये सुरुवातीला औषध फवारणी करून सुरक्षित अंतर ठेवून रक्तसंकलन केले गेले. एकूण ५१ रक्तदात्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिराला रेडक्राँस रक्तपेढीचे चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी यांचे मार्गदर्शन लाभले. रक्तपेढी आपापल्या परीने रक्तदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि रुग्णांना सुरळीत रक्तपुरवठा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. रक्तदानाचा प्रचार- प्रसार होऊन नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी पुढे यावे. रक्तदान जनजागृती अभियानात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी व्हावे व नियमित रक्तदान करावे. कारण रक्तदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. आपले एक रक्तदान चार रुग्णांना जीवनदान देते. स्वेच्छेने रक्तदान करूया असे आवाहन रेडक्राँसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, सह कोषाध्यक्ष अनील कांकरिया यांनी केले आहे. रक्तदान शिबिरात रेडक्रॉसचे रक्तसंकलन अधिकारी डॉ. शंकरलाल सोनवणे, जनसंपर्क अधिकरी वाघ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ- राजेंद्र कोळी, संदीप वाणी दिक्षा पाटील, उमाकांत पाटील यांनी कामकाज पहिले.