जळगाव प्रतिनिधी । कोरोनाची आपत्ती ही सार्वत्रीक असून भाजपने यावर राजकारण करू नये. सध्या सेवा गरजेची असून कोरोना नंतर आंदोलन करावे, असे बजावत भाजपने नाथाभाऊंना क्वॉरंटाईन का केले? याचे उत्तर देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिले. खरीप आढावा बैठकीनंतर गुलाबभाऊ पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी ना.पाटील यांना पत्रकारांनी विचारले की, राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. म्हणूनच येत्या २२ तारखेला ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलनाची हाक दिली आहे. यावर ना. पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव हा फक्त महाराष्ट्रात नाहीय. गुजरात, दिल्ली अगदी उत्तर प्रदेशात देखील आहे, त्यांनी तेथे देखील आंदोलन करावे. मुळात विरोधक म्हणून आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे. परंतू राज्य संकटा असताना आंदोलन करणे हे चुकीचे आहे. या आंदोलनचा चुकीचा संदेश जाईल म्हणून त्यांना विनंती करतो की, कोरोनाची आपत्ती ही सार्वत्रीक असून भाजपने यावर राजकारण करू नये. सध्या सेवा गरजेची असून कोरोना नंतर आंदोलन करावे, असे बजावत भाजपने नाथाभाऊंना क्वॉरंटाईन का केले? याचे उत्तर देण्याची गरज असल्याचा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी भाजपला लगावला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/257839265298333