petrol 6
क्राईम, राज्य

नागपुरात पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडा ; एकाची हत्या, दुसरा गंभीर जखमी

शेअर करा !

नागपूर (वृत्तसंस्था) नागपुरातील हिंगणा एमआयडीसी परिसरातील एका पेट्रोलपंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी आज पहाटे दरोडा घातला. यावेळी दरोडेखोरांनी एकाची निर्घुण हत्या केली. तर दुसऱ्याला गंभीर जखमी केले आहे. दरम्यान, दरोडेखोरांनी एक लाखाची रोकड लुटून नेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

kirana

हिंगणा एमआयडीसी परिसरातील आऊटर रिंग रोडवर असलेल्या एका पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडेखोरांनी आज (गुरुवार) पहाटे दरोडा घातला. तेथील दोन कर्मचाऱ्यांवर घातक शस्त्राने प्राणघातक हल्ला चढवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा चिंताजनक अवस्थेत आहे. दरोडेखोरांनी एक लाखाची रोकड लुटून नेल्याचे कळते. या घटनेचा तपास सुरू झाला असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. दरम्यान, या हल्ल्यामुळे पेट्रोल पंप व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.