मुक्ताईनगरात सलून दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

मुक्ताईनगर प्रतिनिधी । लॉकडाऊनमुळे सलुन दुकाने बंद असल्याने नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी केल्यानंतर तहसीलदार यांनी शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्सिंगचा कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ठेवून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती.

कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून सलून दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ येत आहे. या परिस्थितीत दुकान भाडे, लाईट बिल व कुटुंबाचा खर्च भागवणे सलून व्यावसायिकांना कठीण होत आहे. सलुनची दुकाने पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळावी यासाठी शहरातील नाभिक समाज बांधवांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि तहसीलदार श्याम वाडकर यांना निवेदन दिले.

आमदार चंद्रकांत पाटील आणि तहसीलदार श्याम वाडकर यांच्यात चर्चा करून तुर्तास शासनाच्या नियमानुसार सुलनची दुकाने सुरू करण्याची परवानगगी दिली. मात्र सलुन दुकानात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत सॅनिटायझर व मास्क यासारक्ष्या कोरोना संसर्गापासून बचाव व प्रतिबंधात्मक उपाययोजना दुकाने सुरू करण्यात याव्यात अश्या सुचनाही यावेळी आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यवसायिकांना दिल्या आहेत.

Protected Content