Home आरोग्य यावल येथे कोरोना संशयिताचा मृत्यू

यावल येथे कोरोना संशयिताचा मृत्यू

0
38


यावल प्रतिनिधी । शहरातील तिरूपती नगरातील रहिवासी असणार्‍या एका व्यक्तीचा कोरोना सदृश्य आजाराने आज पहाटे मृत्यू झाला असून त्याचा आधीच स्वॅब नमूना घेण्यात आलेला आहे.

याबाबत वृत्त असे की, यावल शहरात कालच कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. यातच आता शहरातील तिरूपती नगर परिसरातील रहिवासी यांचा कोरोना सदृश्य व्याधीने मृत्यू झाला आहे. आज पहाटे त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. दरम्यान, आरोग्य यंत्रणांनी दिनांक १८ मे रोजीच संबंधीत व्यक्तीचा स्वॅब नमूना घेऊन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला आहे. या व्यक्तीचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

संबंधीत मृत रूग्ण हा भाजीपाला विक्रेता असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता या व्यक्तीच्या स्वॅब नमुन्याचा अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर, शहरात दोन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले असले तरी अद्यापही काही नागरिकांना याचे गांभीर्य कळले नसून लोक लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.


Protected Content

Play sound