यावल प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली येथील ६७ वर्षीय वृद्धासह व ३८ वर्षीय तरूणाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपुर्ण यावल तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून ६७ वर्षीय इसम आजारी असल्याने त्यांनी स्वतःसह नातवानेही स्वॅबव्दारे कोरोना चाचणी केली होती. आज १८ मे रोजी सोमवारी त्यांचा अहवाल प्राप्त झाला असुन दोघे पॉझीटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. या वृत्ताने संपुर्ण यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. तिन दिवसापुर्वीच फैजपुर येथे दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझीटीव्ह आले. तसेच रविवारी डांभुर्णी येथे तीन महीन्याची चिमुकली देखील संयशयीत रूग्ण असल्याचे वृत्त आहे. या चार दिवसात अचानक कोरोनाने यावल तालुक्यात शिरकाव केल्याने खळबळ उडाली असून सर्वत्र भिती व आरोग्याच्या विषयाला घेवुन चिंता व्यक्त केली जात आहे.
आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनास वृत्त कळताच प्रशासकीय यंत्रणेने कोरपावलीत धाव घेतली असुन या संदर्भात सविस्तर माहिती घेणे सुरू केली आहे. त्यांच्या संपर्कात सुमारे ५० कितीजण आले आहे याची माहिती घेणे सुरू आहे. दोन्ही कोरोनाबधितांना रूग्णवाहीकेतून त्यांना जळगावला नेत असल्याचे वृत आहे.