Home राजकीय देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना असे चोख उत्तर मिळाले पाहिजे : अजित पवार

देशावर वाईट नजर टाकणाऱ्यांना असे चोख उत्तर मिळाले पाहिजे : अजित पवार


मुंबई (वृत्तसंस्था) देशावर कोणी वाईट नजर टाकत असेल तर त्यांना असेच चोख उत्तर मिळाले पाहिजे,अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी हवाई दलाने केलेल्या हल्ल्याचे कौतुक करत अभिनंदन केले आहे.

अजित पवार पुढे म्हटले की, भारतीय सेनेने केलेल्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान आहे अशा भारतीय सेनेने पुलवामा घटनेचे उत्तर चोखरीत्या दिले आहे. यात आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून सहभागी आहोत असेही पवार यांनी म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर भारतीय सेनेने दिल्यानंतर त्याचे पडसाद अर्थ संकल्पीय अधिवेशनामध्ये उमटले. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात भारतीय सेनेचे अभिनंदन केले. याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात अभिनंदन प्रस्ताव मांडला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound