शेंदुर्णी प्रतिनिधी । पाचोरा येथील डॉक्टरचे शेंदुर्णी येथेही रूग्णालय असून पाचोरा येथे कोरोना बाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने त्यांना देखील कोरोनाबाधित झाल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, डॉक्टरांच्या संपर्कातील शेंदुर्णीतील सात जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले असून सर्वांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.
शेंदुर्णीत स्वयंस्फूर्तीने तीन दिवसाचा ‘जनता कर्फ्यू’
शेंदूर्णी येथे तहसीलदार अरुण शेवाळे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी राहुल निकम यांनी बैठक झाली. यावेळी तहसीलदार यांनी माहीती जाणून घेतली व काही सूचनाही दिल्या. शेंदूर्णी नगरपंचायत कार्यालयातच बैठक घेण्यात आली. सतर्कता म्हणून वरील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले आहे. प्राथमिक सुरक्षेसाठी २२ लोकांना होम क्वारेंटाईन करण्यात आले. असून नाहरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सोशियल डिस्टन्सचे सर्व नियम पाळावे व मास्कचा नियमितपणे वापर करावा. अति आवश्यकता असल्यासच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे तर येथिल व्यापारी असोसिएशनने स्वयंस्फूर्तीने ३ दिवस जनता कर्फ्यु पाळणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांना दिले व आजपासून ३ दिवस जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे.
सपर्कातील २२ जणांना
पाचोरा येथिल डॉक्टरचे शेंदूर्णी येथे हॉस्पिटल आहे, सदर डॉक्टरांनी आपल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये भडगाव येथिल मृत वृद्धावर उपचार केले होते त्यामुळे डॉक्टरची swab टेस्ट घेण्यात आली होती डॉक्टरांचा कोविड १९ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याचे नजीकच्या संपर्कातील शेंदूर्णी येथिल ७ व्यक्तींचे स्वब चाचणीसाठी घेण्यात आले असून ते नमुने उद्या धुळे येथिल लॅब मध्ये तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे सर्वांचे पहुर येथिल कोविड १९ केंद्रात अलगीकरन करण्यात आले आहे तर दुरच्या संपर्कात आलेल्या चिलगाव ८, शेंदूर्णी ३, कळमसरा ४, लोहारा ६, शहापुरा १ अश्या एकूण २२ लोकांना होम क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यातील एका वृद्धाचा ११ मे २०२० रोजी कोविड १९ विषाणू आजाराने मृत्यू झाल्याचे मृत्यू नंतर आलेल्या पॉझिटिव्ह अहवालात सिद्ध झाले होते त्या वृद्धावर पाचोरा येथिल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यामुळे वृद्धाचे नजीकच्या संपर्कातील डॉक्टर व इतरांचे स्वॅब नमुने घेण्यात आले असता उपचार करणारे डॉक्टरसह १९ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच खळबळ उडाली होती. सदर पाचोरा येथील डॉक्टरांनी शेंदूर्णी येथेही २ महिन्यांपूर्वी हॉस्पिटल सुरू केले होते. गेल्या ४ दिवसापासून हे हॉस्पिटल बंद असून प्रशासनाने ते हॉस्पिटल आज सील केले आहे. दूरच्या संपर्कातील शेंदूर्णी सह आजूबाजूला असलेल्या खेड्यातील २२ लोकांना होम क्वारेंटाईन करण्याचा सल्ला पहुर ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ.हर्षल चांदा यांनी दिला आहे .