अमळनेरातील ३० रूग्ण कोरानामुक्त; माजी आमदारांकडून आर्थिक मदत

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेरातील कोवीड रूग्णालयातून ३० रूग्णांना कोरोनामुक्त म्हणून घरी सोडण्यात आले. अश्या रूग्ण घरी जाऊन सुरक्षित रहावे म्हणून माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी प्रत्येकी ५०० रूपये आणि सॅनिटायझरचे वाटप करून कोरोनाबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी अमळनेर कोरोनामुक्त होत असल्याबद्दल डॉक्टरांसह सर्व कर्मचारी आणि प्रशासनाचे अभिनंदन केले. सोमवारी या आनंदात अमळनेर शहरात विविध ठिकाणी होत असलेली गर्दी आवश्यक सेवा वगळता इतरही दुकाने उघडण्यात आली होती. याबाबत चिंता व्यक्त करून नागरिकांच्या बेशिस्तपणा आणि त्याकडे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष यामुळे पुन्हा वेगाने कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती व्यक्त केली. शासनाने ३१ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढवले आल्याने प्रशासन त्याची काटेकोर अमलबाजवणी का करीत नाही, असा सवाल करून शहरात विविध प्रसंगाच्या निमित्ताने सुशिक्षित आणि सुज्ञ लोक गर्दी करत असल्याचे सांगून याबाबतही त्यांनी संताप व्यक्त केला. सुटका झालेल्या रुग्णांनी आपल्या घरातच राहून साबण, सॅनिटायझर आणि आयुर्वेदिक काढ्याचा उपयोग करण्याचे आवाहन केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आमदार स्मिता वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे, डॉ.संदीप जोशी, डॉ.प्रकाश ताळे, डॉ.गिरीश गोसावी, डॉ. हेमंत कदम, डॉ.आशिष पाटील, नगरसेवक नरेंद्र संदनशिव, मुखायधिकारी डॉ.विद्या गायकवाड, उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड, संजय चौधरी, संतोष बिऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Protected Content