औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहरात रविवारी सकाळी आणखी ५७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यात आढळलेल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९५८ वर पोहचली आहे.

औरंगाबाद शहरातील विद्यानगर, सेव्हन हिल (१) , एन सहा,सिडको (१), पुंडलिक नगर (५), हुसेन कॉलनी (८), राम नगर (३), बहादूरपुरा (८), बारी कॉलनी, गल्ली नं. दोन (१), कबाडीपुरा, बुड्डीलेन (३), शरिफ कॉलनी (३), न्याय नगर (१), न्याय नगर, दुर्गा माता कॉलनी (१),सिल्क मिल कॉलनी (१), घाटी (१), रेंटीपुरा (१), अन्य (२) तर कन्नड तालुक्यातील देवळाणा (२), बाबर कॉलनी (३), सिंधी कॉलनी (१), जालान नगर (१), उलकानगरी (१), रोहिदास हाऊसिंग सोसायटी (१), संजय नगर (१), सातारा परिसर (१), गणपती बाग, सातारा परिसर (६) या भागातील आहेत. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातील २५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


