जळगाव प्रतिनिधी । ट्रॉन्सपोर्टनगर परिसरातील अवैध गावठी दारू अड्डयावर एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून एकाला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातील साडेचार हजार रूपयांची गावठी दारू हस्तगत करून गुन्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी, ट्रॉन्सपोर्ट नगरातील एका हॉटेलच्या शेजारी संघदीप राजू महाले (२९, रा. सद्गुरू नगर) हा व्यक्ती विनापरवाना गावठी, देशी, विदेशी दारू विक्री करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सपना एरगुंटला यांना मिळाली होती़ त्यानुसार एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ट्रॉन्सपोर्ट नगर परिसरातील त्या अवैध दारू अड्डयावर छापा मारला. त्याठिकाणी संघदीप महाले हा दारू विक्री करताना पोलिसांना आढळून आला. तसेच त्यांच्याजवळ आढळून आलेली दारू ही पोलिसांनी जप्त केली आहे. ही कारवाई पो.नि. विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण पाटील, रमेश चौधरी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, सपना एरगुंटला यांनी केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.