औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबाद शहरात आज (बुधवार) रोजी आणखी २४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ६७७ वर पोहोचली आहे.
बुधवारी आणखी २४ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यात अरुणोदय कॉलनी, गांधी नगर ,जय भवानी नगर विजय नगर गारखेडा सातारा परिसर,. एन ८ चैतन्य सोसायटी, घाटी परिसर हुसेन कॉलनी भडकल गेट, राम नगर, संजय नगर २ भावसिंगपुरा, पदमपुरा, गंगाबावडी नंदनवन कॉलनी ५, पुंडलीक नगर, हुसेन कॉलनी, या परिसरात रुग्ण आढळले आहेत. यातील एन ८ मध्ये ९ महिन्याचे बाळ देखील पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सध्या जिल्हा रुग्णालयात ९५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.