Home आरोग्य देशात २४ तासांमध्ये ३६०४ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद

देशात २४ तासांमध्ये ३६०४ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद

0
40

मुंबई (वृत्तसंस्था) देशात गेल्या २४ तासांमध्ये ३६०४ कोरोनाच्या नव्या रूग्णांची नोंद झालीय. तर देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ७० हजार ७५६ वर पोहचली आहे.

 

आतापर्यंत कोरोनाने २२९३ जणांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार ४५४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. त्यामुळे सध्या उपचार घेत असलेल्या कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ४६ हजार ८ आहे. भारतातील कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ३१.१५ टक्क्यांवर पोहचली आहे. दरम्यान, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि दिल्लीसारख्या राज्यात दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत असताना गेल्या चोवीस तासांमध्ये १० राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही.


Protected Content

Play sound