जळगाव प्रतिनिधी । शहरातील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीच्या वतीने जिल्हा कोवीड रूग्णालयाला एबीजी मशीन व ५० पीपीई कीटचे देण्यात आले. आमदार राजूमामा भोळे, वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्करराव खैरे यांची उपस्थिती होती.
रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्ड सिटीतर्फे जिल्हा कोवीड रूग्णालयला एबीजी मशीन व ५० पीपीई कीटची मदत देण्यात आली. ४ लाखांची सीमेन्स कंपनीची ही एबीजी मशीन ह्या कोरोना संक्रमणाच्या काळात ‘आयसीयु’मध्ये भरती असलेल्या कोरोना रूग्णांसाठी वरदान ठरणारी आहे. या मशीनद्वारे रक्तातील वायू, इलेक्ट्रोलाइट्स, मेटाबोलाइट्स आदी बाबींची त्वरीत तपासणी होऊन त्वरीत उपचार सुरू करता येतात. तसेच रक्तातल्या वायूंचे प्रमाण बघून त्याला देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचा स्तर त्वरीत निश्चित करून अत्यवस्थ रूग्णांचे प्राण वाचवण्यास फार मोलाची मदत होणार आहे. तसेच ५० पीपीई कीटमुळे सिव्हिल हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून बचाव करता येणार आहे.
यांची होती उपस्थिती
रोटरी क्लबचे सदस्य राहुल जैन, डॉ. दिपक अटल, वर्षा चोरडिया, नंदु अडवाणी, विनोद जैन, अमित भूतडा, गिरीराज जाजू, उमंग मेहता, प्रिती मंडोरा, महेश मलारा, योगेश आहुजा, प्रसन्न जैन, मनीष पाटील, अभिषेक अग्रवाल, जितू रावलानी, यांनी आर्थिक सहकार्य केले. असे अध्यक्ष संजय दहाड, सचिव राहुल कोठारी, प्रसिद्धी प्रमुख राकेश सोनी यांनी कळविले आहे.