चाळीसगाव प्रतिनिधी । हिरकणी महिला मंडळ व लोकनायक स्व महेंद्रसिंग गोरखनाथ राजपूत प्रतिष्ठान यांच्यातर्फे शहरातील बापजी जीवनदीप मल्टी स्पेशालिटी रूग्णालयातील रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी अन्नसेवा सुरू करण्यात आली आहे.
हिरकणी महिला मंडळ व लोकनायक स्व महेंद्रसिंग गोरखनाथ राजपूत प्रतिष्ठान हे सातत्याने गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी अग्रेसर राहिले आहे. यात मागील वर्षापासून शहरातील बापजी जीवनदिप मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल असलेल्या रुग्णांना व नातलगांना दोनवेळचे जेवण देण्याचे काम अविरत सुरु असतांना महिला मंडळाने शहरातील ग्रामीण रुग्णालयात अन्नसेवा पुरविण्याचा संकल्प घेतला आहे
कोरोना सदृश परीस्थितीत दळणवळण बंद असतांना आपल्या गावाहून रुग्णाला जेवण देण्यासाठी अनेकांचे हाल होत आहेतयात ग्रामीण भागातून येणार्या मंडळीचे जेवणाचे अतोनात हाल लक्षात घेता हिरकणी महिला मंडळाच्या वतीने रुग्णांच्या सेवार्थ मोफत डबे सुरु करण्यात आले आहेत. याप्रसंगी आयबीएन लोकमतचे वृत्तसंपादक प्रफुल्ल साळुंखे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ बी. पी. बाविस्कर, डॉ. संदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रोशन जाधव, नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, विरेंद्रसिंग राजपुत, सोनल साळुंखे, अनिता शर्मा, पत्रकार मुराद पटेल, सूर्यकांत कदम, संदीप कापसे, प्रशांत शर्मा आदी उपस्थित होते.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००