Home Cities धरणगाव कोरोना : धरणगावातील माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मिळणार सुरक्षा कीट

कोरोना : धरणगावातील माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांना मिळणार सुरक्षा कीट


धरणगाव प्रतिनिधी । शहरातील पी.आर.हायस्कूलच्या शिक्षकांना आरोग्याच्या दृष्टीने खबरदारी म्हणून शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सुरक्षा कीट देण्यात येणार आहे.

शहरातील नावाजलेले शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल या शाळेतील शिक्षकांना कोरोना पार्श्वभूमीवर तालुका प्रशासनाकडून चेक नाका बंदोबस्तासाठी ड्यूटी लावली आहे. दरम्यान या शिक्षकांना आरोग्याच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षा नसल्याने शाळेच्या २००० बॅचचे वैद्यकिय क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत शिक्षकांना सुरक्षा किटचे येत्या दोन दिवसात वाटप करण्यात येणार आहे. शिक्षकांना सुरक्षा कीटसाठी माजी विद्यार्थी डॉ. अतुल शिंदे, डॉ. देवेंद्र पाटील, सुशांत सनान्से, मयूर भांडे, सरगम ओस्तवाल यांनी पुढाकार घेतला आहे.


Protected Content

Play sound