Home आरोग्य अमळनेरात कोरोनाचा हाहाकार; चार रूग्ण पॉझिटीव्ह

अमळनेरात कोरोनाचा हाहाकार; चार रूग्ण पॉझिटीव्ह

0
32

जळगाव प्रतिनिधी । अमळनेरात कोरोनाचा प्रकोप कमी होण्याचे नाव घेत नसून आज शहरात पुन्हा चार नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जळगाव व अमळनेर येथील रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 20 कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आता नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहे. तर चार व्यक्तीचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहे.

पाॅझिटिव्ह आढळलेल्या चार व्यक्तीमध्ये 31, 43 व 60 वर्षीय महिलांचा तर 48 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. हे चारही रूग्ण अमळनेर येथील आहेत. निगेटिव्ह व्यक्तीमध्ये 14 व्यक्ती या अमळनेर येथील तर दोन व्यक्ती जळगाव च्या आहेत.जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 57 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००


Protected Content

Play sound