जळगावात आणखी एक कोरोनाग्रस्त : पॉझिटीव्ह महिलेच्या वडिलांना कोरोनाची बाधा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज पुन्हा एक कोरोना रूग्ण आढळून आला असून हा समतानगरातील रहिवासी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर केली आहे. आज आढळून आलेला कोरोनाग्रस्त हा आधीच बाधीत असलेल्या महिलेचे वडील असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी कोरोना चाचणीबाबतची माहिती एका प्रेसनोटच्या माध्यमातून जाहीर केली आहे. यानुसार जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या 38 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल आज नुकतेच प्राप्त झाले आहे. यापैकी 37 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले. तर एक व्यक्तीचा तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. पाॅझिटिव्ह आढळलेला 50 वर्षीय पुरूष हा यापूर्वी पाॅझिटिव्ह आढळलेल्या समतानगर, जळगाव (मुळगाव चिंचोली, ता. बाळापूर, जि. अकोला) येथील महिलेचे वडील आहेत.

निगेटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये शेंदूर्णी येथील अकरा व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 53 इतकी झाली आहे. त्यापैकी तेरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content