Home Cities एरंडोल प्रदीप चांदेलकर यांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड

प्रदीप चांदेलकर यांची पोलीस महासंचालक सन्मानचिन्हासाठी निवड

0
35


एरंडोल , प्रतिनिधी । येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर यांना पोलीस महासंचालक यांच्याकडून सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप पंढरीनाथ चांदेलकर यांना यांनी पोलिस खात्यात उल्लेखनीय कामगिरी बजावल्याबद्दल पोलीस महासंचालकांडून सन २०१९ या वर्षासाठीचे सन्मानचिन्ह घोषित करण्यात आले आहे. एरंडोल पोलीस स्टेशनला हा बहुमान मिळाल्याबद्दल सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे, व सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांच्या हस्ते प्रदीप चांदेलकर यांचा शनिवारी २ मे रोजी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound