श्रीनगर (वृत्तसंस्था) कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडातील भारत-पाकिस्तान सीमेवर शनिवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकाऱ्यांसोबत तीन जवान शहीद झाले आहेत. तर दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले आहे.
शहीद झालेल्या चार जवानांमध्ये एक कमांडिंग ऑफिसर, मेजर आणि दोन जवानांचा समावेश आहे. तर एकजण स्थानिक पोलीस दलातील कर्मचारी होती. शनिवारी रात्री २१ राष्ट्रीय रायफल्सचे जवान हंदवाडा येथील एका घरात शिरले. याठिकाणी दहशतवाद्यांनी काही नागरिकांना ओलीस ठेवले होते. त्यांना सोडवण्यासाठी चार भारतीय जवान आणि एक स्थानिक पोलीस आतमध्ये गेले होते. घरात शिरल्यानंतर आधीपासूनच तिथे लपून बसलेल्या दहशतवादयांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यामध्ये भारतीय जवान शहीद झाले. तर घरात अडकून पडलेल्या नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले आहेत. दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सुमारे आठ तास ही धुमश्चक्री सुरु होती.