Home क्राईम ब्रेकिंग : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाकडून जळगावातील सहा वाईन्स शॉप्सची तपासणी...

ब्रेकिंग : उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाकडून जळगावातील सहा वाईन्स शॉप्सची तपासणी (व्हिडीओ)


 

जळगाव (प्रतिनिधी) उत्पादन शुल्क भागाच्या विशेष पथकाकडून आज शहरातील विविध वाईन्स शॉपची अचानक तपासणी सुरु केली आहे. दरम्यान, शहरातील सर्व वाईन्स शॉपमधील मद्यसाठ्याची तपासणी करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी केली होती. याच अनुषंगाने ही तपासणी सुरु असल्याचे कळते. या वाईन्स शॉप्समध्ये काही बड्या राजकीय नेत्यांच्या दुकानाची समावेश असल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

उत्पादन शुल्क भागाच्या विशेष पथकाकडून आज सकाळी शहरातील सोनी ट्रेडर्स, नशिराबाद, विनोद वाईन्स, नीलम वाईन्स, विजय वाईन्स, राज वाईन्स या सहा ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई सुरू आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत मद्यसाठ्याची तपासणी सुरु होती. दरम्यान, मद्यसाठ्यात तफावत आढळ्यास कडक कारवाईचे संकेत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या काळात शहरातील सिल असलेल्या वाईन्स शॉप्समधील मद्यसाठ्याची तपासणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल नेमाडे, ॲड. कुणाल पवार यांनी राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली होती. एवढेच नव्हे तर, मद्यसाठ्यात तफावत आढळल्यास कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले होते. त्यानुसार आज शहरातील सहा ठिकाणी एकाचवेळी तपासणी सुरु असल्यामुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे. दरम्यान, तपासणी करणारे पथक नाशिक येथील असल्याचे कळते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/325227278462121/?v=325227278462121


Protected Content

Play sound