Home Cities अमळनेर कोरोना: अमळनेरातील कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू

कोरोना: अमळनेरातील कोरोनाबाधित वृध्दाचा मृत्यू


जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संशयीत व पॉझिटीव्ह मृत रूग्णांची संख्या वाढत आहे. आज जळगाव कोवीड रूग्णालयात अमळनेरात कोरोनाबाधित ६५ वर्षीय वृध्दाचा तर दुसरा संशयित कोरोना रूग्णाचा मृत्यू झाला आहे. आता कोरोनाबाधित मृत रूग्णांचा आकडा १० वर पोहचला आहे.

कोरोना वार्डातील एकाचा मृत्यू
कोरोना रुग्णालयात ६५ वर्षीय वृध्द हा २५ एप्रिल रोजी दाखल होता. त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी या वृध्दाचा तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच्यावर उपचार सुरु असतांना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास वृध्दाचा मृत्यू झाला. कोरोनाच्या लक्षणांसोबत या वृध्दाला हृदयविकारही होता, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. तसेच आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास कोरोना हॉस्पिटलमधील कोरोना वार्डात दाखल असलेल्या ६५ वर्षीय मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून व्हेंटीलेटरवर असल्याने संशयित म्हणून त्याचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.


Protected Content

Play sound