जळगाव प्रतिनिधी । कंजरवाडा, जाखणीनगर, सिंगापूर परीसरात बेकायदेशीररित्या देशी दारूभट्टया एमआयडीसी पोलीसांनी उद्ध्वस्त केले. एमआयडीसी पोलीसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी २ लाख ८ हजार रूपयांचा दारू बनविण्याचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
कंजरवाडा, जाखणीनगर, सिंगापूर परीसरात बेकायदेशीररित्या देशी दारूभट्टया लावून दारू तयार करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाल्यानंतर कंजरवाड्यात पोलीसांनी कारवाई करण्यासाठी दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या उपस्थितीत पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक विठ्ठल, सपोनि अमोल मोरे, पोउनि संदीप पाटील, सहायक फौजदार आतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दादाराव वाघ, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, भारती देशमुख असीम तडवी यांनी कारवाई केली.
१. संशयित आरोपी गिता राकेश बागडे (वय-३४) रा. जाखनी नगर, कंजरवाडा या महिलेच्या ताब्यातून २१ हजार रूपये किंमतीचे ३५० लिटर तयार दारू व ६ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन असे एकुण २७ हजार रूपयांचा मुद्देमाल.
२. बंदीया गणेश बागडे (वय-५४) रा. जाखनी नगर या महिलेच्या ताब्यातून १० हजार ५०० रूपये किंमतीचे १७५ लिटर तयार दारू व १२ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन असे एकुण २२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल.
३. उषाबाई यशवंत गारूंगे या महिलेच्या ताब्यातून १० हजार ५०० रूपये किंमतीचे १७५ लिटर तयार दारू व १८ हजार रूपये किंमतीचे कच्चे व पक्के रसायन आणि लपविलेले २४ हजार रूपयांचे ड्रममधील दारू पाडण्याचे रसायन असे एकुण ५२ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल.
४. बबली कन्हैया नेतलेकर हिच्याकडून ४ हजार २०० रूपयांचे तयार दारू, १८ हजार रूपयांचे कच्चे व पक्के रसायन आणि लपवून ठेवलेले १२ हजार रूपये किंमतीचे पक्के रसायने असा एकुण ३४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल.
५. पूजा नितीन बाटुंगे हिच्या ताब्यातील ८ हजार ४०० रूपयांची तयार दारू, १८ हजार रूपयांची गुळ व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन व १२ हजार रूपये किंमतीचे पक्के रसायन असा एकुण ३८ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल.
६. मायाबाई अशोक बाटुंगे हिच्या ताब्यातील ४ हजार २०० रूपयांची तयार दारू, १८ हजाराची गुळ व नवसागर मिश्रीत कच्चे रसायन व १२ हजार रूपये किंमतीचे पक्के रसायन असा एकुण ३४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल.
एमआयडीसी पोलिसांना सिंगापूर पंधरवाडा या भागात काही महिला बेकायदेशीररीत्या अवैधपणे गावठी हातभट्टी लावून देशी दारू तयार करीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जाखनीनगर, कंजरवाडा दुपारी २ ते सायंकाळी ८ वाजेच्या दरम्यान तीन ठिकाणी गावठी दारू हातभट्टी उध्वस्त केले. एमआयडीसी पोलीसात सहा महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.