धरणगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना रूग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. खबरदारी म्हणून धरणगावकरांच्या स्वयंस्फुर्तीने उद्यापासून तीन दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. धरणगाव तालुक्याच्या शेजारी अमळनेर तालुका आहे. अमळनेरात आत्तापर्यंत १८ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यातही रूग्णाची वाढ होवू शकते. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरवासीयांच्या स्वयंस्फूर्तीने ३० एप्रिल ते २ मे २०२० असे तीन दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत व्यापारी असोसिएशन आणि नागरीकांच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळून शहरात विनाकारण फिरणारे, तोंडाला मास्क न वापरणे ५०० रूपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.