चिंताजनक : औरंगाबादमध्ये आज पुन्हा ११ नवीन कोरोना रुग्ण आढळले !

औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये काल दिवसभरात २३ रुग्ण आढळल्यानंतर आज सकाळी पुन्हा ११ नवीन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे औरंगाबादमधील करोना रुग्णांची संख्या १२०वर गेली आहे.

 

औरंगाबादमध्ये साेमवारी एकाच दिवशी सर्वाधिक २९ रुग्ण पाॅझिटिव्ह आले हाेते. त्यानंतर मंगळवारी त्यात आणखी २७ जणांची भर पडली. तर आज आज सकाळी पुन्हा ११ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या १०९ वरून आता १२० वर पोहचली आहे. मंगळवारी घाटीत एका महिलेचा मृत्यू झाला. निधनानंतर तिचा अहवाल तपासणी केला असता ही महिलाही पाॅझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आता शहरात बळींची संख्या सातवर गेली आहे. आज सापडलेल्या ११ रुग्णांमध्ये नूर कॉलनीतील ९, गारखेडा, भीमनगर आणि भावसिंगपुरा येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्वांना संपर्कामुळे कोरोना झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या सर्वांच्या कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आले असून ते राहत असलेला परिसर सील करण्यात येत आहे.

Protected Content