पिंपरी चिंचवडमध्ये १० नवे रुग्ण ; कोरोनाग्रस्तांच्या संख्येने शंभरी ओलांडली

पिंपरी चिंचवड (वृत्तसंस्था) पिंपरी चिंचवड शहरात आजच्या दिवसात आणखी दहा रुग्णांना ‘कोरोना’ची लागण झालीय. यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संख्येने आता शंभरी ओलांडली आहे.

 

कोरोनाग्रस्त दहा जणांपैकी ९ रुग्ण एकट्या रुपीनगर भागातील आहेत. त्यात सहा पुरुष आणि तीन महिला अशा नऊ रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील ‘रुपीनगर’ हा कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरला आहे. गेल्या चार ते पाच दिवसात या भागात तब्बल २६ रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय खडकीमधील ५० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोना बधितांचा आकडा १०६ वर गेला. दरम्यान, आतापर्यंत चौघा कोरोनाग्रस्त रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत, तर २९ रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत.

 

Protected Content