Home क्राईम मुस्लीम व्यक्तीकडून कुणीही भाजी खरेदी करू नका ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

मुस्लीम व्यक्तीकडून कुणीही भाजी खरेदी करू नका ; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

0
123

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एक गोष्ट ध्यानात ठेवा, मी सर्वांना जाहीररित्या सांगतोय, कुणीही मियाँकडून (मुस्लीम व्यक्तीकडून) भाजी खरेदी करणार नाही, अशा वादग्रस्त वक्तव्याचा भाजप आमदाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश तिवारी यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओत ते जनतेला कोणत्याही मुस्लीम व्यक्तीकडून भाजी विकत न घेण्याचे सांगताय. दरम्यान, अलीकडेच जमशेदपूरच्या फळांच्या दुकानांवर विश्व हिंदू परिषदेच्या पोस्टर्सची छायाचित्रे समोर आली आहेत. या पोस्टरमध्ये हिंदू फळांचे दुकान लिहिलेले आहे आणि ते दुकानाच्या बाहेर लावण्यात आलं आहे.


Protected Content

Play sound