Home आरोग्य मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू

मुंबईत पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू


मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईत आज एका पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलीस दलातील हा तिसरा कोरोना बळी आहे.

कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या कुर्ला वाहतूक विभागात कार्यरत मुंबई पोलीस दलातील एका ५६ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला आहे. याआधी मुंबई पोलीस दलातील दोन पोलिसांचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला होता. मुंबई पोलीस दलातील हा तिसरा बळी आहे. दरम्यान, मालेगाव येथून बंदोबस्तावरून परत आलेल्या एसआरपीचे आणखी चार जवानांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल आजच आला आहे. हिंगोली जिल्ह्यातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ११ झाली आहे.


Protected Content

Play sound